श्री विठ्ठल (पांडुरंग) हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीचे केंद्रबिंदू आहेत. विटेवर समचरण उभे असलेले भगवान विठ्ठल हे श्री विष्णू व श्रीकृष्णाचे करुणामय रूप मानले जाते.
संत साहित्य व वारी
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ व संत तुकाराम यांनी आपल्या अभंगांतून विठ्ठल भक्तीचे अद्वितीय विश्व निर्माण केले. आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरीची वारी करतात.